जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील ऊमेद’च्या महिलांनी पंचायत समिती पासून स्वतंत्र भारताच्या ७५ वा अमृत महोत्सव निमित्त ‘उमेद’ अभियानातील महिलांनी ७५ फुट तिरंगा ध्वज तयार करून त्याची मिरवणूक ( रॅली ) करण्यात आली. व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, लोकमाता अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे झाशी की राणी, अशा पद्धतीने विविध पारंपरिक वेशभूषाचा पेहराव परिधान करून कार्यक्रमाची, रॅली काढण्यात आली.

सदर मिरवणुकीत शेकडो महिलांचा सहभाग होता सदर मिरवणुकीत मध्ये मुक्ताईनगर नगरपालिकेतील सर्व नगरसेवक व कर्मचारी व मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी व मुक्ताईनगर तहसील येथील कर्मचारी, मुक्ताईनगर पंचायत समिती येथील कर्मचारी रॅलीमध्ये सहभाग, महिलांसोबत मा.तहसीलदार श्वेता संचेती, मा. गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल मा. पोलीस निरीक्षक शंकर शेळके, मा. मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड ,पीएआय प्रदीप शेवाळे, पीएआय राहुल बोरकर ,पीएआय प्रविणा तळवी, वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार मोजेस पवार, नदु धनके,सहभाग घेतला तसेच सदर मिरवणुकीत महिलांसाठी चहा व पाणीची व्यवस्था ग्राम सुरक्षा दलाकडुन करण्यात आली.ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम, हकिम चौधरी , मोहन मेढे,सचिन पाटिल,यांनी सहकार्य केले व सदर कार्यक्रम यशस्वीसाठी तालुका अभियान व्यवस्थापक पवन सुरडकर,माधुरी भुरे,सिमा शेवाणे,प्रिया वाडेकर व सर्व उमेद क्रेडर यांनी परिश्रम घेतले.








