पंकजा मुंडेंनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांना भेटावे, आ.खडसेंचा सल्ला!

ऑगस्ट 12, 2022 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. यातच आता आमदार एकाथराव खडसे यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे. यावेळी मंत्रीपद मिळवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला खडसे यांनी त्यांना दिला आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने त्या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत थेट भाष्य केले नसले तरी वक्तव्यातून त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. यासाठी आमदार खडसे यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे.

khadse jpg webp

मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला खडसे यांनी त्यांना दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now