चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यास अटक

ऑगस्ट 11, 2022 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांत अटक केली आहे. पुढील कारवाई करीता अमळनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

jalgaon crime 3 jpg webp

एकनाथ उर्फ एका उर्फ योगेश चिंतामण जाधव (वय ३०, रा. नंदाणे ता. जि. धुळे) असे आरोपीचे नाव आहे. डॉ. प्रविण मुंढे, पोलीस अधिक्षक. जळगांव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी किरणकुमार बकाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना पाहीजे फरार आरोपी शोध कामी मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या.त्याप्रमाणे किरणकुमार बकाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार पोहेकॉ संदिप पाटील, पोना. प्रविण मांडोळे असे पोलीस अमलदारांचे पथक नेमूण फरार पाहीजे आरोपीचा शोध बाबत सुचना देवून पथक रवाना केले होते.

अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६/२०१४ भा.द.वि. ३९२, ३४ प्रमाणेच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी नामे एकनाथ उर्फ एका उर्फ योगेश चिंतामण जाधव रा. नंदाणे ता. जि. धुळे ह.मु. सुरत हा नंदाणे गावी आला असले बाबत गोपनिय माहिती मा. श्री किरणकुमार बकाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळाल्याने त्यांनी पोहेकॉ संदिप पाटील, पोना, प्रविण मांडोळे, चालक पोहेकॉ राजेंद्र पवार अशांना आरोपीचा शोध कामी रवाना केले होते. आरोपी नामे एकनाथ उर्फ एका उर्फ योगेश चिंतामण जाधव वय ३० रा. नंदाणे ता. जि. धुळे यास आज दि. ११/०८/२०२२ रोजी ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता अमळनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now