बातम्या

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जळगाव महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीसं महापौर जयश्री महाजन यांनी हिरवा झेंडी दाखवून सुरुवात केली.

आज सकाळी जळगाव महापालिकेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजन करण्यात आली होती. सकाळी ६.३० वाजता महापौर रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर, उपायुक्त प्रशांत पाटील, लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, नगरसचिव सुनील गोराणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, सर्व प्रभाग अधिकारी व जळगाव रनर्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते. रॅलीत सहभागी सर्व क्रीडाप्रेमी व स्पर्धकांना महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.



Related Articles

Back to top button