महापौर संगीत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित ” महापौर संगीत महोत्सव ” येत्या 13 ,14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे आयोजक व संस्थेचे अध्यक्ष मोहन तायडे व सचिव तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती ,तसेच नृत्य,गायक ,वादक यासह इतर कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापौर संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध भागातून कलाकार मंडळी या महोत्सवात हजेरी लावणार आहेत. जळगावकरांना नाविन्यपूर्ण उपक्रम बघता यावे ,रसिकांची गरज पूर्ण व्हावी ,त्यांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी मिळावी यासाठी हा ” महापौर सांस्कृतिक महोत्सव ” घेण्यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे तुषार वाघुळदे यांनी सांगितले.
या ऐतिहासिक संगीत महोत्सवात दि.13 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता व.वा.वाचनालय,रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सोलो डान्स ( 12 वर्षाखालील मुले / मुली ) , सोलो डान्स 13 वर्षांखालील मुले / मुली तसेच समूह नृत्य स्पर्धा ( ग्रुप डान्स ) खुला गट अशा स्पर्धा होतील..सायंकाळी 6 वाजता ( ब्लॅक अँड व्हाईट ) चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होईल. स्थळ व.वा.वाचनालयाचे नवीन सभागृह असेल. दि.14 ऑगस्ट रविवार रोजी व.वा.वाचनालय रेल्वे स्टेशन रोड येथील नवीन सभागृहात सकाळी 10:30 वाजता गीतगायन स्पर्धा खुला गट ( करावोके ) तर दुपारी 2 ते 4 या वेळेत ‘ द ग्रेट मॉम ( केवळ महिलांसाठी ) नृत्य स्पर्धा होतील ,आहे.याच दिवशी दि.14 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतरत्न गानकोकीळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल.
दि.15 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता ” आझादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार आहे,हा देखणा कार्यक्रम जळगाव येथील महाबळ कॉलनी रोडवरील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात होईल. या भव्य-दिव्य सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश, विदर्भ ,मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत, ही आनंददायी बाब आहे,यासाठी प्रवेश अर्ज जळगाव स्पोर्ट्स ,नवीपेठ जळगाव येथे उपलब्ध आहेत. तसेच 9860303888 , 8669343415 तसेच 9405057141 या भ्रमण ध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. वादक व गायक ,गायिका यांचा रियाजही दररोज सुरू आहे ,यासाठी जेष्ठ कलावंत मोहन तायडे, विजयकुमार कोसोदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या भव्य-दिव्य सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश, विदर्भ ,मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत, ही आनंददायी बाब आहे. या महोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे असे महापौर जयश्रीताई सुनील महाजन ,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा जेष्ठ कलावंत मोहन तायडे ,सचिव तुषार वाघुळदे ,सदस्य दिलीप पाटील यांनी सांगितले. संगीत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तुषार वाघुळदे , नाना कोळी,शाम जगताप,दीपक नाटेकर आदी परिश्रम घेत आहेत.