⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक निर्णय, म्हणाले मला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । 2024 लोकसभेचे निकाल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणांहून आश्चर्यचकित करणारे आहेत. दरम्यान, राज्यातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणे सांगितली आहे. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 

नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.यावेळी फडणवीस यांनी ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे अभिनंदन केलं.

महाराष्ट्रात भाजपला 9 जागा मिळाल्या
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. राज्यात भाजपने 9 जागा जिंकल्या, तर त्यांच्या मित्रपक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी अनुक्रमे 7 आणि 1 जागा जिंकली. राज्यातील एकूण 48 जागांपैकी एनडीएला केवळ 17 जागा मिळाल्या. त्याचबरोबर महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळविला.