Lumpy Skin : अमोल जावळे यांच्या निवेदनामुळे जिल्हाभरात लंपी स्किनच्या लसीकरणाला गती!
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात गुरांवर होत असलेल्या लंपी संसर्गजन्य आजार पसरला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी स्व.हरिभाऊ जावळे मित्रपरिवार ग्रुप च्या वतीने अमोल जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांना निवेदन देऊन विनंती केली होती. अखेर लंपी लसीकरणाला जिल्हाभर गती आली असून अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
जावळे यांनी दि.३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,माजी मंत्री व आमदार गिरीशभाऊ महाजन यांना निवेदन देऊन विनंती केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक प्रशासन व तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जिल्हाभरात गावोगावी लसीकरणाला गती मिळाली आहे.याबद्दल पशुपालकांसह स्वर्गीय हरिभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.