⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | विश्व आदिवासी दिन : सावखेडा बुद्रुकमध्ये आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप!

विश्व आदिवासी दिन : सावखेडा बुद्रुकमध्ये आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । रावेर तालुक्यातील सावखेडा बु येथे ९ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी बिरसा मुंडा स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त संरपच लता अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सावखेडा बु चे लोकनियुक्त संरपच लता अनिल पाटील, ग्रामसेवक आर जी चौधरी, तलाठी निलेश चौधरी, उपसरपंच मुमताज तडवी, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, पोलिस पाटील गणेश पाटील, बी यु पाटील, ग्रामरोजगार सेवक विनोद तडवी, सामाजिक कार्यकर्ते अल्लादिन तडवी, लफीत तडवी, अनिल पाटील, संतोष चौधरी,सुभान तडवी, वझीर तडवी, युवराज कराड, नबाब तडवी, रशीदा बी, संगिता महाजन, राजू तडवी,फारुक तडवी, नबाब तडवी,इस्माईल तडवी,जहांगीर तडवी,अरब तडवी,नु.का.तडवी,सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

याबाबत सावखेडा बु ग्रामपंचायतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावातील आदिवासी बांधवांना समाजिक कार्य, लग्न समारंभात उपयोगी भांडे वस्तूंचे वितरण ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भेट देण्यात आले. यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी सरपंच उपसरपंच, सदस्य सह ग्रामसेवक व कर्मचारी यांचें मनस्वी आभार म्हणून त्यांना आनंदाने पेढे भरविले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह