पिंपळगाव हरेत जिओ शोरूम मध्ये चोरी करणारे चोरटे गजाआडग
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । पिंपळगाव हरेश्वर येथे जिओ शोरूम मध्ये चोरट्यांनी दोन लाखांची काही किमती वस्तू चोरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर त्या संशयित चोरट्याना अवघ्या २४ तासात पिंपळगाव हरे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या कामगिरीमुळे पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे जनसामान्यातून कौतुक होत आहे.
अभिजित यशवंत मस्के यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे व कसून चौकशी मुळे अवघ्या चोवीस तासाच्या आत संशयित आरोपींना पिंपळगाव पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे याच्या मार्गदर्शनाखाली psi अमोल पवार, पोलीस हेड कॉस्टेबल रणजित पाटील पोलीस नाईक अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील.पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम. पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांनी केली पुढील तपास psi अमोल पवार करीत आहेत.