जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये दिवाणी,फौजदारी व दाखल होण्यापूर्वी चे विविध वित्तीय संस्थाचे एकूण 1 हजार 877 प्रकरण ठेवण्यात आले होते तर यातील 27 प्रकरणांमध्ये तडजोड करीत निपटारा करण्यात आला व 29 लाख 92 हजाराची वसुली झाली आहे.
यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली यात पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे तर पंच न्यायाधीश म्हणून एड. के.डी. सोनवणे, एड. डी.आर. बाविस्कर यांनी कामकाज पाहिले या पॅनल समोर दिवाणी 79, फौजदारी 192 व दाखल होण्यापूर्वी चे 1हजार 606 असे एकूण 1हजार 877 प्रकरण ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी खटल्यात 13 प्रकरणात तडजोड करून निपटारा करण्यात आला व 18 लाख 03 हजार 348 रुपयांचा वसूल करण्यात आला तसेच फौजदारी प्रकरणात सात केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या व यात 4 लाख 26 हजार 598 रुपयांचा वसूल करण्यात आला तर दाखल होण्यापूर्वीचे सात प्रकरण निकाली काढण्यात आले व 07 लाख 65 हजार 543 रुपयांचा वसूल न्यायालयासमोर करण्यात आला.
तेव्हा एकूण या राष्ट्रीय लोक अदालतिच्या पॅनल समोर ठेवण्यात आलेल्या 1 हजार 877 पैकी 27 प्रकरणात आपसात तडजोड करुन निपटारा करण्यात येऊन 29 लाख 92 हजार 489 रुपयाची वसुली करण्यात आला आहे या राष्ट्रीय लोक अदालत साठी न्यायालयीन अधीक्षक सुनील शुक्ल, सहाय्यक अधीक्षक सी.एम. झोपे, आर. एस. बडगुजर, आर. व्ही. आमोदकर,एस. आर. तडवी, एस.जी सूर्यवंशी, ए.बी. बागुल, डी.ए..गावंडे, एस.ए.ठाकूर, एस. एस. वाघ, जी.एस.लाड, एम.डी.जोशी, एम.एस. सपकाळे यांनी कामकाज पाहिले.– पूर्ण फोटो आहे