जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. मात्र येते ५ दिवस हे पावसाचे असणार आहेत.रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. आता पुढील 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यामध्ये पाऊस येऊ शकतो असा अंदाज आहे.
नारळी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच रक्षाबंधन पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे. असे म्हटले जात आहे. मुंबईत ७ते १० ऑगस्ट रोजी, मराठवाड्यात ९ आणि १० ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कालच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्याला पावसाचा अंदाज दिला होता. पुढील 5 दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
पुढली 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार
पुढील 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून त्यातही हळूहळू वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.