⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जळगावकरांनो सावधान! आज जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२४ । एकीकडे राज्यात कमालीचा उडाका जाणवत असतानाच परतीच्या पावसाचा धुमाकूळही पाहायला मिळत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यावर देखील परतीच्या पावसाचे संकट कायम असून आज सोमवारी हवामान खात्याने जिल्ह्याला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

यामुळे दिवसभरात कधीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. ऑक्टोबरपासून तापमानात कमालीची वाढ झाल्याने उकाड्यासह तीन्न उन्हाचा सामना करावा लागत आहे. तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले आहे; परंतु आता तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने हवामान खात्याने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच मंगळवारीही जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे उकाडा कमी झाला असून, २३ तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. दरम्यान या पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस, ज्वारी, बाजरी व भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान होत आहे. वेचणीवरील कापूस ओला होऊन तो काळवंडण्याचे व पिवळा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी तो विक्रीला काढल्यास त्याला भाव कमी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता पावसाने उघडीप देण्याची प्रतीक्षा आहे.