जळगाव जिल्ह्यावर पावसाचे संकट कायम; वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

ऑक्टोबर 20, 2024 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, मक्यासह कडधान्य पिकांचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पावसाचे संकट जळगाव जिल्ह्यावर कायम असून आज रविवारी देखील जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

20 OctRain

या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याने राज्यामध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वारीतील आहे. तर आज धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.तर राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now