.. तर मनपा ‘त्या’ नागरिकांवर फौजदारी कारवाई करणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । अमृत अभियानांतर्गत दाेन्ही याेजनांसाठी संपूर्ण शहरात खाेदकाम झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे मजबुतीकरण करावे लागणार आहे. यासाठी महापालिका व शासनाच्या माध्यमातून काेट्यवधी रूपये खर्च हाेणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण झाल्यानंतर दाेन वर्षापर्यंत खाेदकाम करता येणार नाही. असा ठराव मनपाच्या महासभेत परील करण्यात आला होता.
मात्र आता विनापरवानगी खाेदकाम केल्यास तिप्पट खर्च वसुल तर हाेईलच साेबत फाैजदारी स्वरूपाची कारवाई करता येते का? याचाही विचार महापालिका पातळीवर सुरू आहे. महापाैर जयश्री महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
गेल्या साडेतीन वर्षापासून शहरात पाणीपुरवठा याेजना सुरू आहे. हे तर अडीच वर्षापासून भुयारी गटार याेजनेचे काम सुरू आहे. या दाेन्ही याेजनांसाठी संपूर्ण शहरात सुमारे ६५० किलाेमीटर अंतराच्या रस्त्यावर खाेदकाम झाले आहे. अनेक ठिकाणी खाेदकामामुळे रस्ताच शिल्लक नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांच्या कामासाठी ५०० काेटींचा निधी लागेल असा अंदाज वर्तवला जाताे आहे. त्यात राज्य शासनाच्या नगराेत्थान याेजना, दलित्तेतर तसेच दलित वस्ती याेजनेच्या निधीतून शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आलेले आहे.
शहरात अमृत याेजनेचे नळ कनेक्शन घेताना खाेदकाम केल्यास रस्त्यांचे बारा वाजणार आहेत. भविष्यात १० वर्षापर्यंत या रस्त्यांची कामे करता येणार नाहीत. तसेच मक्तेदारावरही नागरीकांच्या चुकांमुळे दाेष लावता येणार नाही. त्यामुळे रस्त्यांच्या खाेदकामाबाबत पालिका पातळीवर कठाेर धाेरण ठरवले जाते आहे. पावसाळा संपल्यानंतर शासनाने मंजूर केलेल्या १०० काेटीतील ३८ काेटींच्या निधीतून मंजूर ४९ रस्ते तसेच महापालिका फंडातील सहा रस्ते व डीपीसीतील मंजूर पाच रस्त्यांची कामे सुरू हाेतील असे सुत्रांचे म्हणणेआ याशिवाय गेल्या दाेन महासभांत मंजूर ठरावानुसार निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. यापुर्वी केवळ व्हायची चर्चा, आता थेट निर्णय घेणार