Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, एक गंभीर

ऑगस्ट 7, 2022 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पाचोरा तालुक्यातील हडसन येथे रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत केली.

accident 34 jpg webp

मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे ( वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश रतन भील हे अपघातात गंभीर जखमी झाले आहे. जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील रहिवासी मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे हे त्यांच्याच गावात राहणारा त्यांचा भाचा सुरेश रतन भील हे चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे पीरबाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाचा धक्का लागला. दरम्यान, मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे हे जागीच ठार झाले तर सुरेश रतन भील यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now