धक्कादायक : कौटुंबिक वादातून पत्नीस जबर मारहाण

ऑगस्ट 5, 2022 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । कौटुंबिक वादातून २८ वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 13T124638.838 jpg webp

अजय राजेंद्र कोळी (चिंचोली) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांची बहिण अर्चना भगवान सोळुंके (28) हिला तिचे पती भगवान मुरलीधर साळुंखे (रा.कोळन्हावी, ता.यावल) यांनी कौटुंबिक वादातून जबर मारहाण केली व तिला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालया उपचाराकरीता दाखल केले. कोळी यांनी बहिणीची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला.

भगवान सोळुंके यांच्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान साळुंखे व अर्चना साळुंखे या पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने अर्चना या माहेरी निघून येत असत मात्र त्यांची समजूत घालून सासरी नांदण्यासाठी पाठवण्यात आले मात्र त्यानंतरही पतीला छळ कायम ठेवत पुन्हा पत्नीला मारहाण केली. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now