तुम्ही आमचा ‘गुलाब’ घेऊन गेले मात्र.., उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला!

ऑगस्ट 3, 2022 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । Jalgaon Shivsena ।  जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे मातोश्री निवास्थानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने आता पर्यंत गुलाब पहिला आता भाजपाला काटे दाखवायची वेळ आली आहे. आमचा गुलाब तुमच्या सोबत आला आहे. तो घेऊन जा काही हरकत नाही. तुम्ही फक्त गुलाब घेऊन गेला आहेत मात्र त्या गुलाबाच झाड माझ्याकडे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray vs gulabrao patil)

gulab kate 1 1 jpg webp

शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराने काम करते. आपल्यापासून गद्दारी करत काही गद्दार आज शिवसेनेच्या विरोधात कारवाई करत आहेत. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. शिवसेना ही आपलीच आहे. आता जरी वाईट काळ आला असला, तरी मला तुम्हा सर्व शिवसैनिकांची गरज आहे. शिवसैनिक म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात हे मला माहितीये. मात्र आता कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त निष्ठा पत्र भरून घेणे गरजेचे आहेत. ते काम मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. असे देखील यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनिकांची बोलताना म्हणाले.

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे सत्र लावले आहे. उद्धव ठाकरे रोजच महाराष्ट्रातील विविध शिवसैनिकांची संवाद साधत आहेत. आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद उद्धव ठाकरे यांनी साधला. यावेळी शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काळजी करू नका शिवसेना आपलीच आहे. आपल्याला आता शिवसेना वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई लढाईची आहे. यासाठी अधिक अधिक निष्ठा पत्र भरून घेणे अतिशय गरजेचे आहे. ते काम मोठ्या ताकदीने करा. (Jalgaon Shivsainik Meets Uddhav Thakre)

या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उप महानगरप्रमुख प्रशांत सुरवडकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आदी उपस्थित होते.


WhatsApp Image 2022 08 03 at 3.21.31 PM 1

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now