श्याम पाटील यांची संभाजी ब्रिगेडच्या उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्ष म्हणून निवड

ऑगस्ट 1, 2022 8:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । संभाजी ब्रिगेड राज्यकार्यकारणीची बैठक शिवाजी नगर , पुणे येथे पार पडली. या बैठकीत प्रदेशध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.

श्याम पाटील jpg webp

तसेच तुषार भगवान सावंत यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्षपदी व संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगरध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष सुधीर भोसले, कोषाध्यक्ष अमोल काटे , महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष छगन शेरे व सोमेश्वर आहेर, सचिव आत्माराम शिंदे, संघटक प्रदीप कणसे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह खास, पुणे महानगरध्यक्ष हर्षवर्धन मगदूम हे उपस्थित होते.

या वेळी मनोगत व्यक्त करतांना जास्तीत जास्त मराठा – बहुजन समाजाच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून देश – विदेशात जाऊन आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी असे आव्हान करत येणाऱ्या काळात “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा” या संकल्पेच्या माध्यमातून २० लाख तरुणांना विदेशात स्थैर्य मिळवून देण्याचा मानस प्रदेशध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बोलून दाखवला..!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now