दुर्दैवी : रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला वाहनाने उडविले!

जुलै 30, 2022 2:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । पाचोरा ते मोढांळे रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्या जवळ काल शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळी एक नर जातीचे हरीण रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत हरणाला ताब्यात घेतले आहे. १३ जून रोजी भरधाव रिक्षाच्या आड नीलगाय आल्याने रिक्षा पलटी होऊन चार जण जखमी झाले तर एक जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहराजवळ असणाऱ्या टीव्ही टॉवर जवळ घडली होती.

pachora 1 1 jpg webp

पाचोरा ते मोढांळे रस्त्यावर त्याचवेळी मोढांळे येथील युवक सुकलाल पाटील व राहुल जाधव हे घराकडे जात असतांना त्यांना सदर हरीण मृत्युमुखी पडलेले दिसले. त्यांनी लागलीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले व पंचनामा करत हरीण ताब्यात घेतले. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने सुकलाल पाटील व राहुल जाधव यांनी दाखविलेल्या तत्परतेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now