जिल्हा दुध संघाच्या प्रशासकपदी अमोल शिंदे

जुलै 29, 2022 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची जिल्हा दूध संघावर प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे उपसचिव यांनी आदेश पारित करून नवीन प्रशासक नियुक्ती केली आहे.

jalgaon pachora

अमोल शिंदे यांनी सांगितले की, माझे नेते मा.मंत्री गिरीश महाजन यांनी मला हा सु:खद धक्का दिला. वरिष्ठांनी दाखवलेला विश्वासास नक्की पात्र ठरून, स्वतःच्या परिवाराचा मुख्य पारंपारिक व्यवसाय हा दूध व्यवसाय असल्याने त्या अनुभवाचा नक्कीच जिल्हा दूध संघाच्या प्रगती व विकासासाठी उपयोग करेल व मा.मंत्री गिरीष महाजन यांनी विश्वासाने दिलेल्या संधीचे सोने करेल. याप्रसंगी त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे व खासदार उन्मेष पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व शुभेच्छुकांचे देखील आभार व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now