महाराष्ट्र

उद्धवराजेंचा थेट मुख्यमंत्री शिंदेंना फोन, वाचा दोघांमधील संवाद..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यात आली. या नवीन सरकारला स्थापन होऊन महिना उलटत आला, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार दिल्ली दौऱ्यांवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका देखील केली जात आहे.

दरम्यान, अशातच बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना केलेल्या फोनची सध्या चर्चा सुरु आहे. वन्य प्राणी शेतात करत असलेल्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या संभषणाची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. उद्धवराजे नागरे असं असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरील  संवाद ..

शेतकरी – आमच्या बायगाव बुजरुक, बेंडगाव, अंढेरा धोत्रा, निलगायी भरपूर आहेत. शेतात नुकसान आहे, शेताचं नुस्कान करतात,..
मुख्यमंत्री – काय झाल?
शेतकरी – शेताचं नुस्कान करते नुस्कान..
मुख्यमंत्री – शेताचं नुकसान होतंय निलगायीमुळे?
शेतकरी – हा हा…
मुख्यमंत्री – अच्छा.. कुठला एरिया..देऊळगावराजा तालुक्यामधील बेंडगाव, बायगाव 
मुख्यमंत्री – बेळगाव 
एक मिनिट एक मिनिट..घ्या
अधिकारी – हॅलो हा सांगा आपला कुठला भाग आहे
शेतकरी – बेंडगाव, बायगाव अंढे रा, धोत्रा, शेताचं खूप मोठं नुकसान होतंय साहेबाला सांगा..
अधिकारी – आपल्या तक्रारीची नोंद घेतलीय आम्ही कलेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती देत आहोत
शेतकरी – बरं बरं

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button