मोठी बातमी : वाघूर प्रकल्पाला २ हजार २८८ कोटींची सुधारित मान्यता

जुलै 27, 2022 8:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ ।  राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाला २ हजार २८८ कोटी रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र राज्य कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी वाघूर योजनेसाठी २ हजार २८८ कोटी ३१ लाख रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

waghur dam

माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधी एक मोठी घोषणा केली होती. ज्यात जिल्ह्यातील चार योजनांसाठी सुधारित प्रशासकीय योजनांना मान्यता त्यावेळी महाजन यांनी दिली होती. त्यावेळी वाघूर योजनेसाठी २ हजार २८८ कोटी, हतनूर योजनेला ५३६ कोटी, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेला ८६१ कोटी तर शेळगाव बॅरेज योजनेला ९६८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र महाविकास आघाडीने याला स्थागिती आणली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने याला स्थागिती दिली होती. मात्र आता याला शिंदे सरकारे पुन्हा मान्यता दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now