सावदा (प्रतिनिधी) – अनेक जण आपल्या नातलग अथवा आपचेष्ठ यांचा वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा करून त्यावर मोठा पैसा खर्च करीत असतात मात्र सावदा येथे यासर्व गोष्टींना फाटा देत अंत्यत साध्य पद्धतीने व अनोख्या रीतीने वाढदिवस साजरा करीत वृक्षारोपण केले गेले.
सावदा येथील माजी नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे यांचे नातू साईराज वानखेडे याचा दि 25 रोजी वाढदिवस होता. वाढदिवस अतिशय साध्य पद्धतीने साजरा करायचा व काहीतरी समाजीपयोगी उपक्रम राबवावा असा मानस माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांनी घरात बोलून दाखवला. यास सर्व घरातील सदस्यांनी लागलीच पसंती दिली. सर्व अनावश्यक खर्चास फाटा देत ताराबाई वानखेडे यांनी येथील वैकुंठधामात आपन वृक्षारोपण करावे असे सांगितले.
यास त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे व सर्व भावंडानी सहमती दर्शवली व वैकुंठधामात जाऊन तेथे बेलाचे झाड लावून वृक्षारोपण करीत अनोख्या पद्धतीने आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा केला. समाजापुढे एक आदर्श उभा केला. यापूर्वी देखील त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे अगदी साध्या पद्धतीने केली आहेत. आता देखील त्या आपले कार्य वेगवेळ्या पद्धतीने सुरू ठेवतच आहे