सावदा पालिका निवडणुक : २८ रोजी सोडत

जुलै 25, 2022 8:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । सावदा पालिका निवडणूकिची याअगोदर झालेली प्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर आता नव्याने पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. आरक्षण सोडत दि 28 रोजी निघणार आहे.

voter id


सदर सोडत इतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओ. बी.सी) निघणार असून याअगोदरच एस.सी. व एस.टी प्रवर्गासाठी आरक्षण निघाले होते. 28 रोजी निघणाऱ्या सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्गातील, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण खुले महिला, व सर्वसाधारण असे आरक्षण निघणार आहे. हि सोडत 28 रोजी सकाळी 11 वा नगर पालिका सभागृहात भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे यांचे अध्यक्षतेखाली निघणार आहे. आता या सोडतीकडे सावदेवासीय नागरिक व इच्छुक उमेदवार यांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now