खिरोदा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

जुलै 25, 2022 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgoan 4 jpg webp

रावेर तालुक्यातील खिरोदा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवारी २४ जुलै रोजी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now