जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे बदलीसाठी सूट मिळवल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपंग नसताना बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामसेवक शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्रकुमार काशिनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील यांच्याविरुध्द गुरूवारी रात्री गुन्हा दाखल झाला. शिवाजी सोनवणे यांची अँजिओप्लास्टी झालेली असतांना त्यांनी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे दर्शवून शासनाची फसवणूक केली.
तर उर्वरित पाच जणांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल धुळ्याच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने दिला. यासंदर्भात निंबोल येथील किशोर तायडे यांनी न्यायालयात दाद मागितली होती.