रायसोनी महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या ट्रेनिंग ऑण्ड प्लेसमेंट विभागाचे उत्कृष्ट नियोजन विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर भर देऊन विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आले.
ओलिव्ह क्रिप्टो सिस्टिम्स प्रा.लि., एलटीआय, विप्रो लिमिटेड, वीओटोल वर्क्स, टीसीएस, ओटीया, असेन्चर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील बीसीए व एमसीए विभागातील उमाकांत गोसावी, योगेश पाटील, रामकृष्ण धनगर, सकलीन खान, मोहम्मद अख्तर, सागर पाटील, श्रीकांत पाटील, रश्मी कुलकर्णी, शेरीन वारगेसे, प्रज्वल चव्हाण या दहा विद्यार्थ्यांची मोठे पॅकेज देवून निवड केली.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना एमसीए विभाग प्रमुख प्रा.रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. विनोद महाजन, करिष्मा चौधरी, रुपाली ढाके व ट्रेनिंग ऑण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा आदींनी अभिनंदन केले़.