Breaking : गारबर्डी धरण ओव्हर फ्लो, नदीच्या मधोमध अडकले १० पर्यटक, वाहून जाण्याची भीती, SDRF ला बोलावले
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । सुकी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पर्यटक पर्यटनासाठी या ठिकाणी गेले होते. यादरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यात पर्यटकांना वाचवण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासन करत आहे.
रावेर तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक अडकले असून त्या पर्यटकांना वाचवण्याचे बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदार उशाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार घडला असून या ठिकाणी मदत कार्याचे काम केले जात असल्याचे सांगितले.SDO व तहसीलदार साहित्य व मनुष्यबळासह याठिकाणी रवाना झाले आहेत. तसेच SDRF धुळे पथक बचावकार्यासाठी मागविणे बाबत मंत्रालय नियंत्रण कक्षात कळविले आहे.
रावेर यावल या केळी पट्ट्यातून शेतकऱ्यांसाठी जीवन वाहिनी ठरलेल्या सुकी नदीवरील सातपुड्याच्या कुशीत असलेले गारबर्डी धरण आज दु ४ वाजेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले.या वेळी हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी हा अपघात झाला.