Weather Update Today : हातातोंडाशी आलेला घासही जाणार? शेतकऱ्यांनो अवकाळी पावसाबाबत आजचा दिवस कसा आहे? वाचा..

जळगाव लाईव्ह न्युज : ५ मार्च २०२३ | एकीकडे रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असून त्यातच अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहे. राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील काही भागात रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. (Weather Update Today 5 March 2023)

हवामान विभगाच्या अंदाजानुसार राज्यात चार मार्चपासून ते आठ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. सोबत काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्थिती कशी राहणार?
जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आज पहाटपासून ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्याने जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात सर्वत्र रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च‎ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात‎ अवकाळी, वादळी पावसाचा‎ फटका बसला हाेता.‎ मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस आधीच अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षी २३ मार्च राेजी‎ जळगाव जिल्ह्यात अवकाळी‎ पाऊस झाला हाेता. गेल्या १२ वर्षांत‎ आठ वेळा मार्च महिन्यात‎ अवकाळी पावसाने जाेरात झाेडपले‎ आहे. त्यात चार ते पाच वेळेत‎ गारपीट झाली आहे. सन २०१२,‎ २०१३ या वर्षीच्या मार्च महिन्यात‎ गारपिटीमुळे शेतीचे माेठ्या‎ प्रमाणावर नुकसान झाले हाेते.‎