Indore-Amalner Bus Accident : मुख्यमंत्र्यांनंतर पंतप्रधान कार्यालयाने मयत, जखमींच्या कुटुंबियांना जाहीर केली मदत!

जुलै 18, 2022 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून एसटीचा अपघात झाला. यात मृत व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाने २ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. PMNRF अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी.महामंडळाला सकाळी दिले होते.

mp bus accident 1

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७-२२२३१८० आणि ०२५७-२२१७१९३ असा आहे. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेर कडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सतत मध्यप्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now