बाप रे..! धावत्या वाहनातून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जुलै 17, 2022 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । आपण आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक ठिकाणी घरातून मुद्देमाल लंपास झाल्याची घटना ऐकली तथा वाचली आहे. परंतु, पाराेळा ते एरंडाेल शहरादरम्यान एका धावत्या वाहनातून अज्ञात चाेरट्यांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पारोळ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 8

अब्दुल रजाक मुस्तफा यांनी पोलिसांत तक्रार दिली. मुस्तफा व सकीर मुशर्रफ हे फरिदाबाद येथून वाहन (एनएल- ०१, एए- ६६२१)ने संपर्क इंडिया या कंपनीचा माल घेऊन भिवंडी येथे जात हाेते. एरंडोल ते पारोळा दरम्यान त्यांच्या वाहनातून सीलबंद असलेल्या ६० हजार रुपये किमतीचा कापडाचे साहित्य व १० हजार रुपये किमतीचे प्रिंटर चोरी झाले. पारोळा हद्दीत अाल्यानंतर त्यांना चाेरी झाल्याची घटना लक्षात आली. याबाबत पारोळा पोलिसांत १६ रोजी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now