जळगाव जिल्हा
नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवंदन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । गुरु पौर्णिमा निमित्त नशिराबात येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. मंचावर मुख्याध्यापक प्रविण महाजन, उपशिक्षिका मंगला चौधरी हे होते.
सर्वप्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थांनी आपल्या वर्ग शिक्षकांचा सत्कार केला. तसेच काही विद्यार्थांनी गुरुंबद्दल आदर व्यक्त करून भाषणे सादर केली. त्यात ईश्वरी करुले, भूमी शिवरामे, ऋषि पाटील, योजना ब्रहाटे, कोमल धनगर, यश भारुळे, तनुजा पाटील, विजयकुमार सराफ, लूब्धा चौधरी, यज्ञा सैतवाल, विधी कावळे या विद्यार्थांनी भाषण सादर केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती आत्तरदे यांनी केले.