⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Today : सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार सुरूच, वाचा आजचे दर

Gold Silver Today : सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार सुरूच, वाचा आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात घसरण झाली आहे. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव १४० रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या भाव २१० रुपये प्रति किलोने घसरला आहे. यापूर्वी सोमवारी सकाळच्या सत्रात सोने १६० रुपयाने तर चांदी २०० रुपयांनी महागली होती. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८३० रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,२६० रुपये इतका आहे. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर दिवसातून दोन वेळा जाहीर केले जातात. सकाळ आणि दुपारी अशा दोन सत्रात जाहीर होतात. त्यामुळे दोन्ही धातूंचे दर बदलत असतात.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव एका विशिष्ठ पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात ५३ हजारावर असलेला सोन्याच्या भाव सध्या ५१ हजाराच्या पुढे आहे. यापूर्वी सोन्याचा भाव ऑगस्ट २०२० मध्ये ५६,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. विक्रमी पातळीवरून सोने ४५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

गेल्या आठवड्यातील सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. सरकारने मागील काही दिवसापूर्वी सोन्यावर आयत शुल्क (Import Duty) वाढवले आहे. त्याचा परिणाम दिसून आला होता. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तीन वेळा वाढ आहे तर दोन वेळा घसरले आहे. चांदीच्या दारात दोन वेळा वाढ तर तीन वेळा घसरण झाली आहे. या आठवड्यात चांदीच्या भावात मात्र जवळपास दीड हजार रुपयाची घसरण दिसून आलीय.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम
०७ जुलै २०२२ – रु ५२,६८० प्रति १० ग्रॅम
०८ जुलै २०२२ – रु ५१,८१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो
०७ जुलै २०२२- रुपये ५८,०६० प्रति किलो
०८ जुलै २०२२- रुपये ५८,२७० प्रति किलो

अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.