शिवसेनेसाठी हीच ती वेळ : उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा – गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ ।राज्यात आमदारांचं बंड होऊन सत्तांतर झाल्यानंतर आता खासदारांचा सूरही तसाच काहीसा असल्याच्या चर्चा सुरू आहेत, अशातच आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला “हीच ती वेळ. म्हणत सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत यांच्यावर सडेतोड टीका करत असताना ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीचं किती ऐकलं जावं याचाही विचार करण्याची आता गरज आहे त्याचबरोबर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान केला आहे अजूनही वेळ गेलेले नाही लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. यापुढे 48 पैकी दोन आमदार ही निवडून येतील की नाही अशी शंका देखील त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत बोलून दाखवलेली आहे. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आज लोकसभा खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुरमुक यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे केली त्यांच्या भूमिकेचे स्वागत गिरीश महाजन यांनी केलं, गिरीश महाजन पुढे म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता तरी निर्णय घ्यावा आणि दौपदी मुरमुक यांना पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन महाजन यांनी केलं आहे.
शिवसेनेचे खासदार यांनाही त्याची कल्पना आहे. त्याही पार्लमेंटमध्ये वावरतात पंतप्रधान मोदी आणि भाजपचं काम पाहतात, साहजिक आहे की भाजपच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. गेल्या वेळेस जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले, सर्वांना याची कल्पना आहे की आपण भाजप बरोबर नाही राहिलो तर आपली काय परिस्थिती होणार आहे. प्रत्यक्षात व्यवहारिक ज्या गोष्टी आहेत त्या मान्य केल्या पाहिजे सर्व खासदार मोठ्या मनाने मान्य ही करत आहेत, माझं उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की तात्काळ त्यांनी त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, पक्षाचे वातावर होत चाललेले आहे, लोक पक्ष सोडत आहेत, आमदार पक्ष सोडत आहेत, त्यामुळे यात थोडी जरा चूक झाली तर खासदारांचा मोठा गट त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मतदान करेल, असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे.