⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सरकारच्या आयात शुल्क वाढीनंतर आठवडाभरात सोने-चांदीमध्ये किती बदल झाला? घ्या तपासून दर

सरकारच्या आयात शुल्क वाढीनंतर आठवडाभरात सोने-चांदीमध्ये किती बदल झाला? घ्या तपासून दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने (Central Government) आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोन्याच्या (Gold Rate) भावात किंचित वाढ दिसून आलीय. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण दिसून आलीय. जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८१० रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,२७० रुपये इतका आहे.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या (Silver Rate) भावात चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. सरकारने सोन्यावर आयत शुल्क (Import Duty) वाढवले आहे. त्याचा परिणाम दिसून आला होता. या दोन दिवसात सोने तब्बल १६४० रुपयांनी महागले होते. त्यानंतर मात्र बुधवार आणि गुरुवारी सोन्याच्या भावात घसरण झाली होती. त्यावेळी देखील सोने १६०० रुपयांहून अधिकने घसरले होते.

काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सोने १३० रुपयांनी महागले होते. या आठवड्यात सोन्याच्या भावात तीन वेळा वाढ आहे तर दोन वेळा घसरले आहे. चांदीच्या दारात दोन वेळा वाढ तर तीन वेळा घसरण झाली आहे. या आठवड्यात चांदीच्या भावात मात्र जवळपास दीड हजार रुपयाची घसरण दिसून आलीय.

आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम
०७ जुलै २०२२ – रु ५२,६८० प्रति १० ग्रॅम
०८ जुलै २०२२ – रु ५१,८१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो
०७ जुलै २०२२- रुपये ५८,०६० प्रति किलो
०८ जुलै २०२२- रुपये ५८,२७० प्रति किलो

अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.