भरधाव ट्रकचा इलेक्ट्रीक पोलला धडक, ट्रकचालकावर गुन्हा

जुलै 8, 2022 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । भरधाव ट्रकने इलेक्ट्रीक पोलला धडक देवून नुकसान केल्याची घटना शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसांत ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

मेहरूण परिसरातील भिलाटी येथे महावितरण कंपनीचे ईलेक्ट्रिक रोहित्र बसविण्यात आले आहे. या डीपीवरून मेहरूण परिसरात विद्यूत पुरवठा केला जातो. बुधवार ६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रक (एमएच १८ बीए ५९९) ने जोरदार धडक देवून डी.पी.वरील केबल वाहिनीच्या ईलक्ट्रीक खंब्याला जोरदार धडक दिली. या धडकेत लोखंडी खंब्याचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी महाविरतण विभागाचे सहाय्यक अभियंता चेतन सुधाकर सोनार (वय-३५) रा. धांडे नगर, जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक मोहन तितीया वास्कले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now