दुर्दैवी : पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । पाण्यात बुडाल्याने वेगवगळ्या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनेमुळे त्या त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांच्या मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास किरण पाटील करीत आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे साक्षी सुरेश कापडणे (वय १८) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचा विहिरीत पाय घसरल्याने पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला. याबाबत मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन सोनवणे करीत आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल किशोर तुकाराम तायडे (वय ५४) यांचा मृत्यू झाला आहे. तायडे हे तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याने त्यांच्या मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गजमल पाटील करीत आहेत.