रविवार, सप्टेंबर 17, 2023

जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। जीवेठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ जुलै रोजी सकाळी ११ वाता बोदवड शहरात राहणारा इरफान इस्माईल सैय्यद (वय-२५) याने ओळखीचा फायदा घेवून तिला वेळोवेळी सोबत नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इरफान सैय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे