रेबीजमुक्त अभियानाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ, पशु पापा असोसिएशनचा उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । शहरात पशु पापा असोसिएशनच्या वतीने जळगाव शहर रेबीजमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा सोमवार, ४ जुलै रोजी काव्य रत्नावली चौक येथे महापौर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला.
कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन, युसूफ मकरा, युवा शक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पशुपापा असोसिएशन शहरात मोकाट तसेच इतर प्राण्यांवर उपचारासह लसीकरण अशा विविध पशु वैद्यकीय सेवेचे कार्य करत असते. आता पशुपापा असोसिएशनच्या वतीने ४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 5 जुलै ते 8 जुलै आपत्कालीन प्रथमोपचार प्रशिक्षण, 11 जुलै ते 16 जुलै, रेबीज विरोधी लसीकरण मोहीम व 18 जुलै ते 2 ऑगस्ट प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम या पध्दतीने कार्यक्रम होणार आहे. रेबीजमुक्त शहर करण्यासाठी मिशन रेबीज व्हॅन संपूर्ण भारतभर फिरते. ही व्हॅन रविवारी जळगावात दाखल झाली. या व्हॅनचा डेमोही कार्यक्रमात सादर करण्यात आला. तसेच या व्हॅनची माहितीही यावेळी देण्यात आली. या व्हॅनद्वारे संपूर्ण महिनाभर रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर चालवले जाईल. त्यात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुध्दा केले जाणार आहे.
जळगाव शहरातील महाबळ, डीएसपी चौक, मोहाडी रोड, रायसोनी नगर, वाघ नगर, रामानंदनगर, आदर्शनगर, सिंधी कॉलनी, रिंगरोड, पंचमुखी हनुमान मंदिर, गांधीनगर, प्रतापनगर, गोलाणी मार्केट, फुले मार्केट, भास्कर मार्केट, शाहू मार्केट, शिवकॉलनी, दत्ता कॉलनी, शिव कॉलनी, पिंप्राळा हुडको या भागांमध्ये हे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पशू पापा असोसिएशनच्या अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष कोमल श्रीश्रीमाळ, सचिव भवानी अग्रवाल, सह सचिव अनुज अग्रवाल, व्यवस्थापन प्रमुख हर्षल भाटीया, डॉ. राजपूत यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.