मोठी बातमी : राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त होणार !

जुलै 4, 2022 5:55 PM

petrol diesel

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । राज्यात इंधनावरील व्हॅट कमी करण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार हे नक्की झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला ? याबाबत त्यांनी भाष्य केले. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी राज्य सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट कमी करणार असल्याचे सांगितले. यामुळे आता लवकरच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला व्हॅट कमी करण्यात आल्यामुळे इंधन हे स्वस्त झाले आहे. आता राज्य सरकार देखील हाच निर्णय घेणार असल्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. विशेष करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हा निर्णय घेतल्याचा भाजप आणि शिंदे गटाला लाभ होण्याची शक्यता आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now