जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । धावत्या रेल्वेतुन पडल्याने एका 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसमाची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ शहर पोलिस ठाणे हद्दीतील डाऊन रेल्वे लाईनवर गुरुवारी दुपारी तीन वाजेपूर्वी हा अपघात घडला. मयत रेल्वेत साफसफाई करून मिळणार्या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिसात ऑनड्युटी डीवायएसएस यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विनोद नेवे करीत आहेत.