⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चोरीच्या दुचाकीला बनावट नंबर लावून फिरत होते ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे दुचाकीधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच दुचाकीची चोरून बनावट नंबर लावून फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मेस्कोमातानगरातून अटक केली आहे. दोनही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मेरा भाई उर्फ राहूल रवींद्र कोळी (वय २२) व पप्पू उर्फ राहुल रामदास कोळी (वय २८, दोन्ही रा. मेस्कोमातानगर) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेरा भाई उर्फ राहूल रवींद्र कोळी याला मेस्कोमातानगरातून अटक केली. त्यांच्याजवळ चोरीची दुचाकी (क्रमांक एमएच १९, डीएच- ७७८९) आढळून आली.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने ही दुचाकी साथीदार पप्पू उर्फ रवींद्र रामदास कोळी यांच्या सोबत चोरी केल्याची कबुली दिली, पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. चौकशीत दुचाकीवरील क्रमांक हा बनावट असल्याची कबुली दिली, ही दुचाकी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले