ZP News : गुलाबरावांच्या बंडामुळे सेनेला बसणार फटका; इच्छुकांची पळापळीची तयारी !
जळगाव लाईव्ह न्यूज । Jalgaon ZP News । जळगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे बंडखाेर आमदार गुलाबराव पाटील आता उद्धववासी नसून शिंदेवासी झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र बदलणार आहे. आता त्याच्या बंडामुळे शिवसेनेला थेट फटका बसणार आहे. याचबरोबर इच्छुक उमेदवार पळापळीच्या तयारीत आहेत. (Jalgaon ZP News)
गुलाबराव पाटील हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी जिल्हा परिषद गट व गणावर पकड ठेवली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात निधी दिल्याने ही पकड अधिक घट्ट झाली आहे. दुसरीकडे चाेपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्या कुटुंबाचे तालुक्यात राजकीय वजन असल्याने त्याचाही फायदा बंडखाेर गटालाच मिळणार आहे. शिवसेेनेची ताकद वाढल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला याची धास्ती होती; मात्र गुलाबरावांच्या बंडामुळे तालुक्यात शिवसेना थंड पडणार आहे.
बंडखाेरीमुळे तालुक्यात सेना नेतृत्वहीन हाेऊ नये याचे प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील काही समर्थक, पदाधिकारीही त्यांच्या सोबत जातीलही. तसे झाल्यास सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरच सेनेचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.
गटरचना अंतिम झाली असून, इच्छुकांना आता आरक्षणाची प्रतीक्षा आहे. गट, गण रचनेत काही निवडक गावे बदलली आहेत. बहुतांश माजी गट, गण सदस्यांसह काही हौशीही पुन्हा निवडणुकीत उतरण्यास इच्छुक आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये पंचायत समितीत सभापतिपदासाठी जातप्रमाणपत्राच्या सक्तीमुळे भाजपच्या यमुनाबाई रोेटे यांना संधी मिळाली. अडीच वर्षांनंतर सेनेच्या दोन सदस्यांनी सभापतीपद भोगले. गटातही सेनेचा एकच सदस्य असताना पालकमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे जि. प. सभागृहात सेनेची ताकद वाढली होती.
शिवसेनेची ताकद
गट : सेना १, भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस २
गण : शिवसेना ५, भाजप ३, अपक्ष २ (शिवसेना पुरस्कृत)
आरक्षणानंतरच इच्छुकांच्या घडामोडींना वेग येणार
म्हसावद गटातून निवडून आलेले शिवसेनेचे पवन सोनवणे यांचे गाव भादली बु. गटात गेले आहे. या गटात आरक्षण बदलाची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास तेथे ते पुन्हा नशीब अजमावू शकणार आहे; मात्र त्यांना योग्य पक्षाची निवड करावी लागणार आहे. कानळदा भोकर मधून प्रभाकर सोनवणे, माजी पं.स. सदस्य ऍड. हर्षल चौधरी ही गटातून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. आसोदा गटात पं.स. सदस्य ज्योती महाजन, पती तुषार महाजन, माजी सदस्य पल्लवी देशमुख यांचे पती रवी देशमुख यांच्यासह जिल्हा बँक उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत. तर गणात गिरीश भोेळे, सुभाष महाजन, महेश भोळे, संजय भोळे यांचेही नाव पुढे येत आहे. शिरसोलीतून रावसाहेब पाटील, नंदलाल पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर यासह म्हसावद गटातून विशाल देवकर, पवन सोनवणे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. तर नव्याने तयार झालेल्या भादली बु.- कुसुंबा गटात लालचंद पाटील, पवन सोनवणे, मिलिंद चौधरी, पंकज महाजन, विकास पाटील यांचीही नावे पुढे येत आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षण निघण्याची शक्यता आहे. यामुळे या आरक्षणानंतरच इच्छुकांच्या घडामोडींना वेग येणार आहे.
ही पकड अधिक घट्ट झाली आहे. दुसरीकडे चाेपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्या कुटुंबाचे तालुक्यात राजकीय वजन असल्याने त्याचाही फायदा बंडखाेर गटालाच मिळण्याची शक्यता आहे. तालुक्यात शिवसेेनेची ताकद वाढल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला याची धास्ती होती; मात्र गुलाबरावांच्या बंडामुळे तालुक्यात शिवसेना थंड पडण्याची शक्यता आहे. बंडखाेरीमुळे तालुक्यात सेना नेतृत्वहीन हाेऊ नये याचे प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील काही समर्थक, पदाधिकारीही त्यांच्या सोबत जातीलही. तसे झाल्यास सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरच सेनेचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.