⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | नागपूर विभागातील ब्लॉकमुळे भुसावळमार्गे मुंबई, पुणे, सुरतकडे जाणाऱ्या या गाड्या रद्द

नागपूर विभागातील ब्लॉकमुळे भुसावळमार्गे मुंबई, पुणे, सुरतकडे जाणाऱ्या या गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२३ । दिवाळी सण साजरा होऊन पंधरा दिवसाहून अधिक दिवस उलटले. दिवाळीनंतर प्रवाशी परतीच्या मार्गावर असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. अद्यापही अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत असून यामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ दिली. मात्र दुसरीकडे रेल्वेकडून तांत्रिक कामामुळे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागतोय. नागपूर विभागातील नॉन इंटरलॉकिंग कामामुळे ब्लॉक घेण्यात आला असून यामुळे भुसावळमार्गे मुंबई, पुणे आणि सुरतकडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागातील कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार असून या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते ११ डिसेंबर या कालावधीत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द
गाडी : कोणत्या तारखेला रद्द
१२८७० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस – ८ डिसेंबर
१२८६९ सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस – १० डिसेंबर
२२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस – १० डिसेंबर
२२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस – १२ डिसेंबर
१२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस – ८ व ९ डिसेंबर
१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस – १० व ११ डिसेंबर
१३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस – २ व १२ डिसेंबर
१३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस – ४ व ११ डिसेंबर
१२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस – ८, ९, ११ व १२ डिसेंबर
१२१०२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस – १०, ११, १३ व १४ डिसेंबर
२०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस – ४, ७ व ११ डिसेंबर
२०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस – ७, १२ व १४ डिसेंबर
२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस – ९ डिसेंबर
२०८२१ पुणे – संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस – ११ डिसेंबर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.