जळगाव शहर

112 मुळे वाचले आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे प्राण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रणालीने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या एका महिलेचे प्राण वाचले आहे.

जिल्ह्यात वारंवार मारहाण, भांडण तंटा या सारख्या घटना घडत असतात.त्यामुळे अश्या ठिकाणी जावुन पिडितांना मदत मिळवून देता येईल या उद्देशाने ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शहरातील लीला पार्क, आयोध्या नगर परिसरातील महिला मेहरूण तलाव येथे आत्महत्तेचा प्रयत्न करित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना 112 वर मिळाली. त्याप्रमाणे डायल 112 ला कर्तव्यावर असलेले PC 512 राहुल चंद्रकांत रगडे यांना त्यांनी लागलीच सदर घटनास्थळी रवाना केले.

दरम्यान, सदर महिलेस सुमारे एक ते दिड तास मन परिवर्तन करून तलावाच्या काठावरून बाहेर आणले. त्यांनतर राहुल चंद्रकांत रगडे यांनी महिलेच्या पतीस बोलविले व दोघांना पोलिसात आणले. त्यांनतर संगीत घालून महिलेस तिच्या पतीच्या ताब्यात दिले.

Related Articles

Back to top button