खळबळजनक : जळगाव जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलीस पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । जिल्ह्यातील विविध ठिकाणी हुन तब्बल तीन अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

यावल तालुक्यातील भालशीव गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले आहे. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत. चाळीसगाव शहरातील बस स्टॅन्ड येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुहास आव्हाड करीत आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील १६ वर्षीय ११ महिन्याच्या अल्पवयीन मुलीस देखील पळवून नेले आहे. याबाबत मेहुणबारे ता. चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास योगेश मोंडोळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now