जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । बसमध्ये चढताना ६२ वर्षीय आशाबाई विश्वास पाटील यांच्या ताब्यातील पर्स कापून तब्बल तीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घडला घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पुन्हा प्रवाशांमध्ये एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आशाबाई पाटील यांनी पारोळा पोलिसांत तक्रार दिली आहे.
पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील रहिवासी आशाबाई विश्वास पाटील (वय ६२) या दि.२७ रोजी सकाळी १२.०० वाजेच्या सुमारास म्हसवे येथून पारोळा बस स्टॅन्ड वरून त्यांच्या सुने स्वाती निलेश पाटील रा. धुळे यांना भेटण्यासाटी जात होत्या. दरम्यान, पारोळा हुन धुळेकडे बस रवाना होत असल्याने त्या गाडी मध्ये चढत असताना कुणी तरी पर्स ओढत असल्याचे लक्षत आले. त्या लागलीच गाडी मधून खाली उतरल्या व पर्स पाहिले असता त्यात ठेवले दागिने दिसून आले नाही. त्यामुळे कुणी तरी अज्ञात इसमाने लंपास केल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच परिसरात शोध घेतला. मात्र मिळून आले नाही.
त्या मध्ये ४ टोळ्याचा १ लाख २० हजाराची सोन्याचा चपटी हार, ४ टोळ्याचा १ लाख २० हजाराची हातातील सोन्याचा बांगड्या, ६० हजाराचा सोन्याचा राणी हार, ९ हजाराची सोन्याची अंगठी असा तब्ब्ल ३ लाख ९ हजारांचा ऐवज अज्ञात भामट्याने लंपास केला. याबाबत आशाबाई विश्वास पाटील यांनी पारोळा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार भा. कलम ३८९ प्रमाणे अज्ञात भामट्याविरुद्व गुन्हा दखल झाला आहे. तपास बाबुराव पाटील करत आहे.