वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी गजाआड

जून 28, 2022 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । किनगाव येथील आत्माराम नगरात मराबाई सखाराम कोळी (वय ७५) या एकट्याच राहत होत्या. २३ मे रोजी एका भामट्याने घरात प्रवेश करून हातातील चांदीच्या पाटल्या काढण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला. एका हातातील पाटल्या काढून झाल्यावर शेजाऱ्यांची चाहूल आल्याने त्याने स्वत:जवळील साहित्य तेथेच सोडून पोबारा केला.

crime 2022 06 28T102739.010 jpg webp

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या मराबाई यांच्या जळगाव येथे उपचार सुरू होते. ३१ मे रोजी त्यांचा मृत्यू झाल्याने यावल पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, तपासात यश येत नव्हते. त्यामुळे २३ जूनला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वत: घटनास्थळ गाठून तपासाच्या टिप्स दिल्या. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण बकाले, यावलचे उपनिरिक्षक विनोद खांडबहाले तपासात होते. त्यांनी संशयित म्हणून बाळू उर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार याला ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now