मोठी बातमी ! शिंदे गटाचे अधिकृत नाव जाहीर

जून 25, 2022 1:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीने राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलेला असून आता अशात एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. त्यांनी आपल्या गटाचे नवीन नाव देखील ठरल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे नवीन नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं ठेवलंय. याबाबत आज सायंकाळपर्यंत घोषणा होण्याची शक्यता आहे.

eknath shinde guwahati

शिंदे गटाच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे जवळपास ४० आमदार व इतर आमदारांसह एकूण ४५ हुन अधिक आमदार शिंदे यांच्या गटात आहेत. बंडखोर आमदारावर कारवाईसाठी शिवसेनेकडून पाऊल उचलली जात आहेत. मात्र अशात एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर सहकारी आमदारांसह स्वतंत्र गट स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून याचे नाव देखील ठरल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं ठेवलंय. याबाबत आज सायंकाळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भारत गोगावले यांनी याबाबतचे सूतोवाच केले असले तरी स्पष्ट बोलणे टाळले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now