आसाम मध्ये बसलेले पुन्हा निवडून येणार नाहीत – शरद पवार

जून 23, 2022 8:21 PM

sharad pawar jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने खूप मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार फसलं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आज जे बंडखोर आमदार आसाम मध्ये आहेत. ते केव्हा ना केव्हा महाराष्ट्रात येतील. त्यांना आपल्या मतदारसंघात मतदारांची बोलावं लागेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल यामुळे ज्या प्रकारे भुजबळ यांच्या सोबत असलेले इतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले त्याकाळचे सर्व आमदार पडले त्याचप्रमाणे शिंदे सोबत असणारे इतर जण महाराष्ट्रात पुन्हा निवडून येणार नाहीत असं होऊ शकतं अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडा ही संजय राऊत यांची भूमिका नसून ही त्या बंडखोर आमदार यांची भूमिका असल्यामुळे संजय राऊत हे जे म्हणले याचा विपर्यास करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. याच बरोबर भारतीय जनता पक्षाचा देखिल या गटाला असल्याचेही या वेळी पवार म्हणाले पुढे बोलताना पवार म्हणाले की अडीच वर्ष जेव्हा सत्ता महाविकास आघाडीची होती. तेव्हा तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का? हिंदुत्व हे केवळ आणि केवळ ढोंग असून त्यांच्यावर कोणाचातरी दबाव असल्याचे पवार म्हणाले.

 शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचे म्हटले जात असून राज्यातील सत्ता पालट होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच जनतेशी संवाद साधत मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यामुळे आता पवारांच्या पत्रकार परिषदे नंतर काय होते ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now